कणकवली : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष करीत कणकवली तालुक्यात गुरुवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. कोकणात सर्वच ठिकाणी घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते. गणेशोत्सव हा कोकण वासियांचा सर्वात मोठा उत्सव आहे. हा सण सर्वच ठिकाणी आनंदात साजरा केला जातो. दीड, पाच, सात, नऊ, अकरा आणि एकवीस दिवस ठेवून गणेशाचे मनोभावे पूजन केले जाते. व त्यानंतर गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात येतो. या वर्षी २७ ऑगस्टला घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी गणरायाचे आगमन झाले. गुरुवारी या गणेशोत्सवाला दीड दिवस पूर्ण झाले. या दीड दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.
कणकवली शहरातील गणपती साना येथे भाविक भक्तांनी गणपती बाप्पा एकत्र आणत याठिकाणी आरती गाऱ्हाणे करत दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिला.
फोटो-
कणकवली
शहरातील जाणवली नदी गणपती सान्यावर दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जनावेळी आरती करताना भाविक भक्त! ( छाया अनिकेत उचले )