आत्महत्येच कारण मात्र अस्पष्ट
घरामागील मांगरात घेतला गळफास
कणकवली : कणकवली शहरातील निम्मेवाडी भागातील प्लंबर कामगार मिलिंद प्रकाश तावडे या 36 वर्षीय युवकाने गणेशचतुर्थी दिवशीच घरामागील मांगरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मिलिंद तावडे हा प्लंबर ची कामे करायचा. गणेशचतुर्थी दिवशी मिलिंद याने गणपती आरती साठी येणाऱ्या वाडीतील मंडळींसाठी प्रसाद खरेदी करून आणला. त्यानंतर घराबाहेर गेलेला मिलिंद घरी आला नव्हता. गणेशचतुर्थी दिवशी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मिलिंद याचा मृतदेह घराशेजारील मांगराला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. मिलिंद याच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती कणकवली पोलीस ठाण्यात काळविल्यानंतर लागलीच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत मिलिंद याच्या पश्चत आई वडील विवाहित बहीण असा परिवार आहे. मिलिंद याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.