कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घोटगे ख्रिश्चनवाडी येथे राहणाऱ्या महिलेला काल (रविवारी) रात्री शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, लीना जोसेफ लॉन्ड्रीक्स ही महिला एकटीच राहत असून मध्यरात्री १ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरावर चढून तिला काठीच्या मदतीने विजेच्या शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत कुडाळ पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. याबाबत स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून ही घटना चोरीच्या उद्देशाने केली असावी, असा अंदाज आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीचा श्वानपथक आणून त्याचा तपास करण्याची मागणी केली आहे.