कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांची तडीपारी हायकोर्टाने रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तडीपारी ची कारवाई केली होती. या तडीपारी आदेशा विरोधात पिळणकर यांनी हायकोर्टात धाव घेत अपील दाखल केले होते. या अपिलाची सुनावणी होऊन 25 ऑगस्ट रोजी हायकोर्टाने अनंत पिळणकर तसेच देवेंद्र पिळणकर यांच्यावरील तडीपारीची कारवाई रद्द केली आहे. त्यामुळे पिळणकर यांना ऐन गणेशचतुर्थी आधीच मोठा दिलासा मिळाला आहे.