ऐतिहासिक दिवसाची नोंद ;
प्रकल्पग्रस्तांना हक्काचा भूखंड
पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही
माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या काळात प्रकल्पाची सुरुवात
लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण प्राधान्याने
कणकवली :नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज तसेच हक्काचे भूखंड यांचे वाटप करण्यात करण्याची संधी मला मिळाली. हे आर्थिक पॅकेज व भूखंड हे तुमच्या हक्काचे आहे. या प्रकल्पाला गती देण्याचे काम माझे राहील असे आश्वासन बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी बोलताना दिले. नरडवे धरणग्रस्तांना आर्थिक पॅकेज व भूखंड वाटपाचा शुभारंभ आज पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. नितेश राणे म्हणाले, “आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रकल्पग्रस्तांना हक्काचे भूखंड मिळत असून हा क्षण सर्वांच्या सहकार्यामुळे साध्य झाला आहे. यापुढे या प्रकल्पाला गती देणे ही माझी जबाबदारी असेल. या प्रकल्पाची सुरुवात तत्कालीन पालकमंत्री आदरणीय नारायण राणे साहेबांच्या काळात झाली होती. या प्रकल्पासाठी ज्यांनी आपली जमीन दिली आहे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे ही आमची जबाबदारी आहे.”