मालवण : तालुक्यातील विरण येथे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय्य सहाय्यक राकेश परब यांच्या माध्यमातून वाढदिवसा निमित्त विरण पंचक्रोशीतील जनतेला रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राकेश परब यांच्या हस्ते विरण बाजारपेठ येथे संपन्न झाले.
यावेळी माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी पं. समिती अध्यक्ष राजेंद्र देसाई, मसदे – चुनवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शमिका वाडकर, राखी राकेश परब, उद्योगपती तसेच समाजसेवक दया देसाई, कॉन्ट्रॅक्टर संतोष मुणगेकर, सचिन पाताडे, दिपक भोगले, मंगेश पालव, अमित देसाई, राजाराम ठाकूर, दत्ताराम आंबेरकर, संतोष पाटणकर अर्जुन पवार, महेश माधव बाबू परब, मुकेश नार्वेकर समर्थ मेडिकलचे मालक शेखर सुपल, समिर वाळके व सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सौ.ई. द. वर्दम हायस्कूल पोईप विरण या प्रशालेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी राकेश परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हि केले.