20.4 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

वैभववाडी :
वैभववाडी रेल्वे स्टेशन हे प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन आहे. या स्टेशनवरुन वैभववाडीसह देवगड व गगनबावडा तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. या स्टेशन वरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांची लवकरच भेट घेणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.
वैभववाडी रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, नेहा माईणकर, शारदा कांबळे, रोहन रावराणे, अतुल सरवटे, संजय सावंत, प्रकाश पाटील, प्रकाश सावंत, देवानंद पालांडे, रेल्वे अधिकारी श्री बापट, पीआरओ सचिन देसाई, व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले, ज्या कामाचे भूमिपूजन आम्ही करतो, त्याचे उद्घाटनही आम्हीच करतो. त्याचे हे उदाहरण आहे . जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, माजी मंत्री विनोद तावडे, मी स्वतः या स्टेशन वरील प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत. या स्टेशनकडे जाणारा रस्त्यासाठी आपण लवकरच निधी उपलब्ध करून देणार. नेत्रावती गाडीसह इतर गाड्यांना थांबा देण्यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल.
तिकीट सुविधा तसेच लाईट सुविधा उपलब्ध करून देणार असे आश्वासन रेल्वेचे अधिकारी बापट यांनी दिले. प्रमोद रावराणे यांनी तिकीट घर तसेच नेत्रावती गाडी तसेच अन्य सुविधा बाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. पादचारी पुलाचे उद्घाटन नामदार नितेश राणे व भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रवासी व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!