20.4 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

उबाठाचे सौंदाळे शाखाप्रमुख महेश मोंडे यांचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भाजप प्रवेश

उबाठाचे बूथ प्रमुखही भाजपामध्ये

सौंदाळे मध्ये उबाठाचा प्रभाव संपला

देवगड : उबाठाचे सौंदाळे येथील शाखाप्रमुख महेश बाळकृष्ण मोंडे यांनी देवगड येथे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सौंदळे बाऊलवाडी येथील शाखाप्रमुख म्हणून ते काम पाहत होते. त्यांच्या प्रवेशामुळे सौंदाळ्यातील उबाठा सेनेचा प्रभाव संपुष्टात आला आहे.

महेश मोंडे यांच्यासोबत विनायक गुरव, बुधप्रमुख रुपेश गुरव, पद्माकर गुरव यांनीही भाजपा प्रवेश केला. यावेळी गावचे सरपंच विष्णू राणे, महेश मोरये, रमेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जिल्ह्याचे सरचिटणीस संदीप साटम, मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ बंड्या नारकर जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळ खडपे हे व्यासपीठावर होते

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!