बांदा : बांदा- सटमटवाडी येथे अतिवृष्टीमुळे राकेश विरनोडकर यांच्या मालकीच्या शेत मांगराची भिंत कोसळून अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल घडली असून महसूल प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा केला आहे. श्री. विरनोडकर आज सकाळी आपल्या बागेत गेले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. तात्काळ त्यांनी याची माहिती महसूल प्रशासनाला दिली. प्रशासनाने घटनास्थळी येऊन पाहणी केली असून नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला आहे.