मला हलक्यात घेऊ नका ; सूचनांचे पालन करा
अड्ड्यावरील धाडीत १२ जणांवर गुन्हे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याने तरुण पिढी वाया जात असल्याचा तक्रारी सतत वाढत होत्या. अनेक लोक दारू, मटका, जुगार, यासारख्या अन्य मार्गाना जाऊन वाया जात होती. अनेक संसार देखील यात उध्वस्त झाले, त्यामुळे असे सुरू असलेले अवैध धंदे बंद व्हावेत अशी मागणी जोर धरत होती.
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी जेव्हा पालकमंत्री पदाची शपथ घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले तेव्हाच पोलीस प्रशासन आणि यंत्रणेला अशा धंद्यांवर तात्काळ कारवाई करून बंद करा, अशी सक्त सूचना देखील पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केली होती.
त्यानंतर अवघे आठ ते दहा दिवस सुरू असलेले अवैध धंदे बंद होते. त्यानंतर हळूहळू पुन्हा या धंद्यांनी डोके वर केले.
मात्र पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी जेव्हा पालकमंत्री पदाची शपथ घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले तेव्हाच पोलीस यंत्रणेला आणि जनतेला विश्वास दिला होता. की, या जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करू. याबाबतीत कोणालाही सुटका मिळणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही. मात्र पोलीस यंत्रणेचा काहीसा या अवैध धंद्यांवरील ताबा सुटला अन् पुन्हा हे अवैध धंदे सुरू झाले.
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याकडे कणकवली शहरात सुरू झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक वर्ष मटक्याचे बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा महादेव रमाकांत घेवारी यांच्या गोडावूनची माहिती मिळाली होती. दरम्यान पोलीस यावर कारवाई करतील म्हणून पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांना तसेच कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना सक्तीची सूचना केली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लख केले.
गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कणकवली बाजारपेठ मध्ये सुरू असलेल्या त्या मटका गोडावूनवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पोलिसांना कल्पना न देताचा आपण केलेल्या सूचनेचा आढावा घेतला. मात्र या ठिकाणी मटक्याचे बस्तान मांडून लाखों रुपये घेऊन बसलेले महादेव रमाकांत घेवारी (६५, रा. कणकवली बाजारपेठ) यांच्यासह रवींद्र श्रीपत चव्हाण (४४, रा. कणकवली टेंबवाडी), मयुर मनोहर पांडव (३० रा. जानवली – वाकाडवाडी), संदीप शंकर पडवळ (४६, रा. कणकवली, कनकनगर,) चंद्रकांत शंकर गवाणकर (५७, कणकवली परबवाडी), प्रशांत शशिकांत घाडीगावकर (४६, रा. वरवडे), महेश आत्माराम बाणे (२७ रा. कणकवली, मधलीवाडी), अनिल श्रीपत पाष्टे (४८, कलमठ – लांजेवाडी), सतीश विष्णू गावडे (४०, वागदे – गावठणवाडी), संतोष शंकर राठोड (४३, कलमठ गावडेवाडी) तुषार यशवंत जाधव ( ४२, बागदे – सावरवाडी), महेंद्र चंद्रकांत देवणे (३५, कणकवली -बाजारपेठ) सापडून आले.
याबाबतची पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांना व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून घटनाक्रम अगदी लाईव्ह पद्धतीने दाखवला. तसेच याबाबतच्या वारंवार सूचना करून देखील कणकवली पोलिसांच्या नाकाखाली हे सुरू असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान ना. नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना माहिती नसलेली मटका बुकिंग च्या उलढालीची जागा दाखवण्यासाठी बोलावले असता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून यायला तब्बल अर्धा तास लागला. त्यामुळे पालकमंत्री नाम. नितेश राणे अजूनच संतप्त झाले होते. पोलीस निरीक्षक अतुल जाधव घटनास्थळी आल्यावर पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी हे तुमच्या नाकाखाली नेमकं काय सुरू आहे ? असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे उत्तरच नव्हते. नेहेमीप्रमाणे कारवाई करतो असे उत्तर देऊन ते गप्प बसले.
परंतु ना. नितेश राणे यांनी मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढी बिघडवायची नाहीय. असे धंदे मला सुरूच नको आहेत. याबाबतीत तर मी काहीही खपवून घेणार नाही. त्यामुळे यावर जे काय कारवाई कराल ती याच ठिकाणी करा अशा सक्त सूचना केल्या. तसेच त्या गोडावून ची झाडाझडती घेतली असता एकट्या महादेव रमाकांत घेवारी यांच्या परिधान केलेल्या कपड्यांतच तब्बल ५७ हजार रुपये सापडले. तसेच टेबल मांडून बसलेल्या ठिकाणी २ लाख २१ हजार ७१५ रुपये सापडले.
दरम्यान यावरच न थांबता तुम्ही काय कारवाई करणार हे मला पहायचे आहे. पुन्हा काही वेळाने भेट देईन. तोपर्यंत यातील आरोपींवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले. त्याचप्रमाणे नाम. नितेश राणे यांनी तेथील लॅपटॉप हा स्वतः ताब्यात घेतला आणि हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दाखवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस देखील विचारात पडले होते.
दरम्यान यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, विनोद सुपल, रवींद्र पन्हाळे, विनोद चव्हाण, पांडुरंग पांढरे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान पोलिसांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार घटनास्थळाचा पंचनामा करून रोख रक्कम, मटक्याच्या पावत्या, मोबाईल यांसह अन्य वस्तू जप्त केल्या होत्या.