विशाल परब पुन्हा भाजपात, रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत घरवापसी
निलंबनाची कारवाई मागे
लवकरच पक्षाकडून कोकणची जबाबदारी देणार
सावंतवाडी : निलंबनाची कारवाई मागे घेत युवा नेते विशाल परब यांना आज पुन्हा एकदा भाजपात सामावून घेण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना प्रवेश देण्यात आला. लवकरच त्याच्यावर कोकणाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अनिल निरवडेकर, प्रभाकर परब, रविंद्र परब, आनंदी परब आदी उपस्थित होते.