कणकवली : नाथ पै ज्ञानप्रबोधिनी करूळ हायस्कूल येथे पार पडलेल्या कणकवली तालुकास्तरीय विज्ञान मेळावा २०२५ – २६ मध्ये एस. एम. हायस्कूल, कणकवलीच्या विद्यार्थ्यांने माध्यमिक गटात वक्तृत्व स्पर्धेत विशेष चमक दाखवत प्रशालेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. अथर्व राठवडने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या विज्ञान मेळाव्यात सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवली चे कार्याध्यक्ष डॉ. एस. सी. सावंत, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉ. एस. एन. तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.