कणकवली : “जीवन आनंद संस्था” यांच्या वतीने कणकवली येथील स्थानिक रहिवासी असलेल्या डॉ. हेमा तायशेटे यांच्या वाढदिवसा निमित्त कणकवली रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
या स्वच्छता अभियानावेळी कणकवली रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर आनंद चिपळूणकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे, डॉ. विद्याधर तायशेटे, मेघा गांगण, संतोष कांबळी, रमेश मालविय, गुरुनाथ पावसकर, लवू पिळणकर, अनिल कर्पे, अंकिता कर्पे, सोनू मालविय, राजश्री रावराणे, स्मिता पावसकर, सुमन पिळणकर इ. मान्यवरांसह रेल्वे कर्मचारी आणि जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर या उपक्रमातून स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे मत व्यक्त केले. जीवन आनंद संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात असे उपक्रम नियमित राबवले जातील, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.