जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा मिळेल – खा. नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास
कणकवली ( मयुर ठाकूर ) : येथील गुरुकृपा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व सरस्वती फाउंडेशन यांच्यावतीने गुरुकृपा हॉस्पिटल येथे याल्यस फर्टिलिटी व आव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) सेंटर सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिन व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्यसाधून खा. नारायण राणे यांच्या हस्ते व सौ. निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत याल्यस फर्टिलिटी व आव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खा. नारायण राणे यांनी या उद्घाटन प्रसंगी या सेवेचे कौतुक केले. तसेच अशा नवनव्या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळेल असा विश्वास देखील खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.