26.9 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

उबाठा गटाच्या साटेली -भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत शेकडो उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपवासी

दोडामार्ग :
साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सेजल धर्णे, इस्माईल चांद, विष्णु सुतार, राजन सावंत तसेच उबाठाचे दोडामार्ग तालुका उपसंघटक गणपत डिंगणेकर, कोणाळ विभाग प्रमुख सुमन डिंगणेकर यांच्यासह शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

ना. नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत करीत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व भाजपमध्ये तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. तुमच्या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, संदीप साटम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवेशकर्त्यांमध्ये राजन सावंत, स्नेहलता नाईक, गुरुनाथ नाईक, कलैया हिरेमठ, किरण धर्णे, संग्राम धर्णे, आनंद नाईक, रवी धर्णे, राजन तांबे, विराज धर्णे, रुपेश धर्णे, योगेश धर्णे, संजय नाईक, रामदास कदम, प्रशांत नाईक,निलेश धर्णे, धनश्री
धर्णे, कल्पेश धर्णे, आदित्य मयेकर, संजय आरोसकर, सागर धर्णे, राजेंद्र गवस, सीता सुतार , माधवी धर्णे, बेनीत फर्नांडीस, विशांक घोगळे, अरविंद धर्णे, संदेश धर्णे, जगन्नाथ धर्णे, मंथन डिंगणेकर, सुरेश धर्णे व नारायण धर्णे यांच्यासह उबाठा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!