वयाच्या पंधराव्या वर्षी बिहारमधून कणकवली मध्ये झाले होते स्थायिक
कणकवली : शहरातील प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्थान टेलर या दुकानाचे मालक रियाज मन्सुरी (वय 58) यांचे काल गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच त्यांना निमोनिया झाल्याची माहिती समोर आली होती. हिंदुस्तान टेलर या नावाने त्यांनी आपले टेलरिंग व्यवसायामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते. टेलरिंग व्यवसायामध्ये त्यांनी आपला एक वेगळा ब्रँड निर्माण केला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी ते बिहार येथून कणकवली मध्ये टेलरिंग व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले. कणकवलीतील एका टेलर जवळ कामाला राहत त्यानंतर त्यांनी हिंदुस्तान टेलर या नावाने आपले दुकान सुरू केले. या दरम्यान त्यांनी आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली. कणकवलीतील अनेक नावाजलेल्या राजकीय व्यक्तींसहित अन्य मोठ्या प्रसिद्ध लोकांचेही कपडे शिवण्या साठी कपड्यांच्या परफेक्ट फिटिंग साठी ते टेलरिंग व्यवसायामध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर हरकुळ बुद्रुक येथील कब्रस्तान मध्ये दफन विधी करण्यात आले.