24.4 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

जलजीवन मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून द्या

ठेकेदारांनी वेधले नारायण राणेंचे लक्ष

जलशक्ती मंत्र्यांशी चर्चा करून निधी देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन

मालवण : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांनी केंद्रीय निधी मिळवण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी ठेकेदारांनी राणे यांना एक निवेदन सादर करून निधीची मागणी केली. यावर राणे यांनी ठेकेदारांना जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी चर्चा करून निधी मिळवण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान, ठेकेदारांनी जल जीवन मिशनच्या कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. निधीअभावी कामांमध्ये विलंब होत असून, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठेकेदारांच्या या समस्येची दखल घेत खासदार नारायण राणे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी ठेकेदारांना धीर देत राणे म्हणाले, “या निधीसंदर्भात मी लवकरच जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी दिल्ली येथे चर्चा करीन. आपल्या जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.” यावेळी ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सावंत, बिपीन कोरगावकर, सागर मालवदे, प्रसाद मोरजकर, प्रदीप सामंत, सुभाष सावंत आणि राजेश तांबे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नारायण राणे यांच्या आश्वासनामुळे ठेकेदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!