सावंतवाडीत आयोजित “तिरंगा रॅली” ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी : तिरंगा भारत देशाचा गौरवशाली इतिहास सांगतो त्यामुळे या राष्ट्रध्वजाची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते तथा हर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी आज येथे केले. भाजपच्या माध्यमातून आज सावंतवाडी शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला सावंतवाडी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, विद्यार्थी, रिक्षा संघटना, सामाजिक संघटना आदींचा मोठा प्रतिसाद लाभला. ही रॅली सावंतवाडी राजवाड्यापासून सुरू करण्यात आली. त्यानंतर शहरात फिरून येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान परिसरात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी “भारत माता की जय..!!”, “वंदे मातरम..!!”, “भारतीय सैन्याचा विजय असो..!!” अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत मिलाग्रीस हायस्कूल, पंचम खेमराज महाविद्यालय,भोसले नॉलेज सिटी, आरपीडी हायस्कूल, कळसुलकर हायस्कूल, महेद्रा अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगांवकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर, पुखराज पुरोहित, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ , सांगेली सरपंच लवू भिंगारे, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर, सुकन्या टोपले, मिसबा शेख, सिद्धेश तेंडुलकर, जिल्हा कार्यकारी सदस्य चंद्रकांत जाधव, दिलीप भालेकर, प्राध्यापक विकास गोवेकर,अमेय तेंडोलकर नाथा कदम हेमंत खानोलकर, मेघना साळगांवकर, यांच्यासह तालुक्यातील विद्यार्थी , एनसीसी कॅडेट्स, महिला, डॉक्टर, पत्रकार, व्यापारी, तसेच तालुक्यातील असंख्य देशप्रेमी नागरिक यांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली. यावेळी सावंतवाडीकरांच्या मनात असलेल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती यावेळी दिसून आली.