दोडामार्ग येथील घटना
कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे तालुक्यात कौतुक
दोडामार्ग : घाई गडबडीत कचऱ्यात हरवलेले दीड लाखाचे मंगळसूत्र दोडामार्ग येथील महिलेला परत मिळाले आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे हे शक्य झाले. याबद्दल त्या कर्मचाऱ्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे. ही घटना आज दोडामार्ग येथे घडली. सोनाली आप्पा देसाई असे तिचे नाव आहे. घाई गडबडीत काम करत असताना त्यांचे मंगळसूत्र कचऱ्यातून गेले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची कल्पना आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी डम्पिंग ग्राउंडवर शोधाशोध केली. यावेळी ते मंगळसूत्र कचऱ्यात आढळून आले. त्यानंतर त्यांनी ते देसाई यांना परत केले.