संदिप तोरसकर विरोधात गुन्हा दाखल
कणकवली : एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने कणकवली शहरातील नाथ पै नगर येथील संदीप अरुण तोरसकर याच्या घरातून १४ हजार ३०० रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे. आरोपी संदीप तोरसकर विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर. बी. शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार किरण देसाई यांच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४: ३० वाजता केली.
आरोपी संदिप तोरसकर याच्या ताब्यात अवैध गोवा बनावटीचा दारूसाठा असल्याची माहिती एलसीबी ला मिळाली होती. त्यानुसार आरोपी तोरसकर याच्या घरी पहाणी केली असता १४ हजार ३०० रुपयांचा गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा आढळून आला. एलसीबी सहाय्यक उपनिरीक्षक जामसंडेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संदीप तोरसकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक विनोद सुपल करत आहेत.