यंगस्टार कणकवली संघ उपविजेता
कणकवली : भालचंद्र मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने विद्यामंदिर प्रशालेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम सामना दिर्बादेवी जामसंडे देवगड विरुद्ध यंगस्टार कणकवली संघ यांच्यात झाला. यात दिर्बादेवी जामसंडे देवगड संघाने यंगस्टार कणकवली संघाचा पराभव करत भालचंद्र चषकावर नाव कोरले. स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक भद्रकाली गुढीपुर संघाने पटकावले व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक गिरोबा सांगेली संघाने पटकावले. या स्पर्धेत १४ संघांनी सहभाग घेतला. यामध्ये अष्टपैलू खेळाडू प्रथमेश पेडणेकर (यंगस्टार कणकवली), उत्कृष्ट चढाई सुशील पाटकर (दिबदिवी जामसंडे देवगड), उत्कृष्ट पकड सिद्धेश भडसाळे (दिबदिवी जामसंडे देवगड) यांना देण्यात आले. सर्व संघाना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.