कणकवली : गणेश चतुर्थीनिमित्त वागदे येथे महामार्गानजीक सुरू असलेल्या ‘अरविंद महासेल’ला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कमी दरात उत्तम वस्तू मिळत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.
टेम्बे स्वामी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या महासेलमध्ये साड्या, हँडलूम आणि रेडिमेड कपड्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध आहे. पुष्पा साड्या फक्त ४०० रुपयांपासून, पैठणी २५० रुपयांपासून आणि सिल्क साड्या ३०० रुपयांपासून उपलब्ध असल्याने महिला वर्गाचा विशेष प्रतिसाद मिळत आहे.
या सेलमध्ये फक्त कपडेच नव्हे तर ब्लँकेट आणि टॉवेलसुद्धा अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला परवडेल अशा दरात खरेदी करता येत आहे.
हा सेल २४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.