21.4 C
New York
Tuesday, August 12, 2025

Buy now

राजन परुळेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. निलेश राणेंची उपस्थिती

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील उद्योजक राजन परुळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी परुळेकर यांना मालवण उपशहरप्रमुख म्हणून नियुक्तीपत्र दिले. परुळेकर यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी, उद्योजक आणि व्यावसायिक यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये संतोष शिरगावकर, सनी परुळेकर, संजय परुळेकर, जेम्स डायस, रॉकी डिसोझा, ऑलविन फर्नांडिस, फ्रँकी डिसोझा आणि बाबू मोरजकर यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गावकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे मालवणमधील शिवसेनेला अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. याबाबतची माहिती शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!