कुडाळ : नातं हे फक्त जन्माचं नाही, तर ते मनापासून जपलेलं असावं लागतं, हा महत्त्वाचा संदेश देत ब्रह्मकुमारी संस्थेने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.रक्षाबंधनाचे औचित्य साधून ब्रह्मकुमारी संस्थेने कुडाळ नगरपंचायत कार्यालयात हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थेच्या ब्रह्मकुमारी हर्षा, अंकिता चव्हाण, अजय वालावलकर, आणि कमलाकर बांदेकर यांनी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, मुख्याधिकारी अरविंद नातू आणि इतर कर्मचाऱ्यांना राखी बांधली. याप्रसंगी त्यांनी ध्यान साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. ब्रह्मकुमारी संस्थेच्या या उपक्रमाचे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. या कार्यक्रमात नगरपंचायतीचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.