28 C
New York
Saturday, August 9, 2025

Buy now

मटका घेताना आढळल्या प्रकरणी गुन्हा

कणकवली : कल्याण मटका नावाच्या जुगारावर लोकांकडून पैसे स्विकारून खेळ खेळविताना आढळल्याप्रकरणी आनंद लक्ष्मण मोहिते (५२, वरवडे – पळसेवाडी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार पांडुरंग पांढरे व कॉन्स्टेबल दिग्विजय काशीद यांनी येथील बस स्थानकानजीकच्या एका टपरीमध्ये शनिवारी दुपारी १२.३० वा. सुमारास केली. यात २ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्याद दिग्विजय काशीद यांनी दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!