5.4 C
New York
Sunday, March 15, 2026

Buy now

कणकवलीत प्रतिष्ठित व्यापारी महेश नार्वेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कणकवली : शहरातील प्रतिष्ठित व्यापारी महेश चंद्रकांत नार्वेकर ( वय ४५ ) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेऊन ते घरी गेले होते. आज सकाळी पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. पंरतु उपचारापूर्वीच त्यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. महेश नार्वेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष पद देखील सांभाळले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांचे ते भाऊ होत.

महेश नार्वेकर हे कणकवलीतील मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. कणकवली शहराच्या सामाजिक चळवळीत त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असे. नेहेमी हसतमुख व मोठा मित्रपरिवार असलेले व्यापारी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

निधनाचे वृत्त समजतात कणकवलीतील विविध क्षेत्रातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!