रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन दरम्यान विशेष गाड्या धावणार
कणकवली : रेल्वे गाड्यांतील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
यामध्ये रेल्वे नंबर ०११२५/०११२६ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (टी) विशेष, रेल्वे नंबर ०११२५ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन विशेष १४/०८/२०२५ (गुरुवार) रोजी २२:१५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून निघेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी १२:४५ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. रेल्वे नंबर ०११२६ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) विशेष १५/०८/२०२५ (शुक्रवार) रोजी दुपारी १:४० वाजता मडगाव जंक्शन येथून निघेल. ही रेल्वे लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता पोहोचेल. ठाणे येथून सुटल्यावर रेल्वे गाडी पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्टेशनवर थांबेल.