कोकण मराठी साहित्य परिषदेकडून आयोजन
कणकवली : येत्या ११ ऑगस्ट रोजी श्रावण सोमवारी कणकवली येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कवी कट्टा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर ५ मध्ये हा कार्यक्रम दुपारी ३:३० वाजता होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेच्या बैठकीमध्ये हा कार्यक्रम आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. कणकवलीतील आणि जिल्ह्यातील कवींना व्यासपीठ मिळावे आणि काव्य सादर करण्याची संधी मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी कट्टा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेचे सचिव श्री निलेश ठाकूर (९४२१९१९०७८ ) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त नवोदित कवींनी आणि सुप्रसिद्ध कवींनी सुद्धा आपल्या कविता या कार्यक्रमांमध्ये सादर कराव्या आणि त्या ऐकण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेचे कणकवली शाखेचे अध्यक्ष श्री माधव कदम आणि कवी कट्याचे संयोजक गणेश जेठे आणि जेष्ठ साहित्यिक, कवयित्री कल्पना मलये यांनी केले आहे.