25.4 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

कणकवलीतील महसूल विभागाच्या नऊ मंडळांमध्ये महाराजस्व अभियान संपन्न

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यात १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन व दिनांक १ ते ७ ऑगस्ट २२०५ या कालावधीत महसूल सप्ताह -२०२५” साजरा येणार आहे. त्यानुसार कणकवली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय नऊ ठिकाणी ४ ऑगस्ट रोजी राबविण्यात आला. या उपक्रमात महसुल विभागाच्या विविध योजनांची जनजागृती व नागरिकांना सेवा देण्यात आल्याची माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.

कणकवली तालुक्यातील सर्व नऊ मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत महसूल प्रशासनाच्या सेवा व योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न आमच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामध्ये सातबारा वाटप, वारस फेरफार, मंजूर फेरफाराची प्रत, संजय गांधी योजना चे मंजूर लाभार्थी यांना मंजुरीचे पत्र, जातीचे दाखले, उत्पन्न व वय अधिवास दाखले, कलम १५५ अंतर्गत सातबारा दुरुस्तीचे आदेश, केंद्रीय पेन्शन योजनाचा लाभ घेण्यासाठी सत्यापन ॲपद्वारे हयात दाखला यासह विविध लाभ देण्यात आले. या उपक्रमात मंडळातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कणकवली तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी मंडळ कार्यालयांमध्ये सातबारा, ८ अ व फेरफार १८१, उत्पन्न दाखले -३३, संजय गांधी, श्रावणबाळ योजना मंजूर आदेश ३८, वारस अर्ज कार्यवाही ९, कलम १५५ अंतर्गत अर्ज -६, सत्यापन अॅप हयात प्रमाणपत्र २३, जातीचे दाखले ६, वय अधिवास ५, एनसीएल दाखले ३ असे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

आधार अपडेशन कॅम्प

महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने दिनांक ५ ऑगस्ट रोजी संजय गांधी योजनेतील ज्या लाभार्थी यांना आधार अपडेट नसल्याने “डीबीटी’ द्वारे पेन्शन मिळत नाही, अशा लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालय कणकवली येथे आधार अपडेशन कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तरी ज्या लाभार्थ्यांचे आधार अपडेट करायचे राहून गेले आहे. त्यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!