गेली अनेक वर्षे प्रशांत मेस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती
प्रशांत मेस्त्री यांच्या निधनाने सर्वत्र होतेय हळहळ व्यक्त
कणकवली : दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री ( वय ५० रा. हरकुळ खुर्द सुतारवाडी ) यांचे विजेच्या धक्क्याने निधन झाले. गेली अनेक वर्षे प्रशांत मेस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांच्या अचानक जाण्याने दशावतार कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
प्रशांत मेस्त्री यांच्या निधनाने दशावतार क्षेत्रातील कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने एका उत्कृष्ट कलाकाराला आपण मुकलो, अशा भावना दशावतारप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, वडील असा परिवार आहे.