सध्या होत असलेले प्रवेश हे नितेश राणेंचे अपयशच
शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख उत्तम लोकेंचा संदीप मेस्त्रींवर पलटवार
कणकवली : नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अकार्यक्षम आहेतच, कारण तुमच्या पक्षाचा
पालकमंत्री असताना पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश कसे करतात ही तुमची निष्क्रियता आहे. जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण होते तेव्हा असे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत न्हवते. नाईक बंधु हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकनिष्ठ राहून एकच पक्षात काम करत आहेत, पण राणे बंधू हे आपल्या स्वार्थासाठी दोन वेगवेगळ्या पक्षात आहेत. काँग्रेस मधून स्वाभिमान पक्ष काढलात नंतर भाजप असे अनेक पक्ष फक्त आपल्या फायद्यासाठी बदलणाऱ्या राणेंनी आपली निष्ठा या आधीच विकून टाकली आहे, असे सडेतोड उत्तर यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिले.
आपल्या स्वार्थासाठी काल भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी, नाईक कुटुंबियांनवर टीका केली, हे फक्त पालकमंत्री राणे यांना खुश करण्यासाठी बोलतात यांच्या सारख्या काही लोकांचा उदरनिर्वाह कामातील टक्केवारी वार चालतो, तसेच आपल्या सख्या भावाला सुद्धा हे कलमठ मधील राजकारणात हस्तक्षेप करू देत नाही, आधी संदीप मेस्त्रींनी आपल्या घरातील वाद मिटवावा नंतर नाईक बंधूनवर टीका करावी असे प्रत्युत्तर यावेळी लोके यांनी दिले.
आताचे जे तुम्ही घर बांधत आहात ते पण दुसऱ्यांच्या जीवावरच बांधत आहात, देवळात जश्या देणगीदारांच्या पाट्या लावाव्या लागतात तश्या पाट्या तुम्हाला चिरे, वाळू, खडी अश्या देणगीदारांच्या पाट्या तुम्हाला तुमच्या घराला लावाव्या लागतील. त्यामुळे व्यवसाय करून राजकारण करा असा सल्ला यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिला.
संदीप मेस्त्री हे कोणते मोठे नेते नाहीत, मोठ्या नेत्यांमध्ये त्यांनी बोलू पण नये. सध्या काही मंडळींनी फुगे फुलवले प्रमाणे त्याला फुगवलेले आहे. एक दिवस ती हवा निघणार आणि पिन मारणारे त्यांचेच सहकारी असणार, त्यांचे अस्तित्व फक्त कलमठ गावा पुरतेच मर्यादित आहे. वस्तुस्थिती अशी आहे की गावच्या मूलभूत प्रश्नांवर ते पूर्णतः निष्क्रिय आहेत. गावातील लाईटचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. चांगले रस्ते करण्याची कुठलीच तयारी किंवा योजना नाही. केलेले रस्ते 6 महिन्याचा आत वाहून गेले. अजून पण कलमठ गावामधे ड्रेनेजचे पाणी कलमठ नळयोजने मध्ये मिक्स होत आहेत. त्यामधे सरपंच म्हणुन किंवा त्यांचे नेते काहीही करू शकले नाहीत. ज्या विकासकामांची बात केली जाते, ती कामे फक्त स्वतःच्या घरासाठी. कलमठ मध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकार झाले आहेत. हे सर्व मी लवकरच पुराव्यांसकट उघड करणार आहे. स्वतःच्याच घरात सदस्य पद देताना आपल्या चुलत भावाला डावलणाऱ्या लोकांना इतरांच्या नीतीवर बोलण्याचा अधिकार नाही.