चौके : मालवण कसाल हमरस्त्यावरील कुणकवळे कुपेरीचे घाटीत गुरुवारी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी दोन भले मोठे गवारेडे अनेक वाहन चालकांच्या समोर आल्याने वाहन चालकांची भंबेरी उडाली प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या वाहनचालकांनी इतर वाहन चालकांना तसेच ग्रामस्थांना गवारड्यांच्या फोटोसह माहिती दिल्याने काही काळ या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकात घबराट निर्माण झाली होती. कुणकावळे गावाच्या वस्तीनजीक एक वगैरे आल्याने गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर या गवारड्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून तसेच मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.