एकजण फरार ; शनिवारी करणार न्यायालयात हजर
कणकवली : मूळ उत्तर प्रदेशमधील तर जानवली ( ता. कणकवली ) येथे राहणाऱ्या चौघा तरूणांमध्ये हाणमारी झाली. यात एका तरूणावर ब्लेडने वार करून त्याला जखमी करण्यात आले. या प्रकरणी तिघा आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले तर एकजण फरार असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली. तर ताब्यात असलेल्या प्रेमचंद निसाद (वय ३५), संतराम निसाद (वय ३८) दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर पवन निसाद (वय ३५) हा आरोपी फरार झाला असून पोलीसांची पथके त्याच्या मागावर आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे करत आहेत.