पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते महसूल दिनी १ ऑगस्ट रोजी होणार पुरस्कार वितरण
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जाहीर केले पुरस्कार
सिंधुदुर्गनगरी : महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांची घोषणा केली आहे. यामध्ये भूसंपादन उपजिल्हाधिकारी आरती देसाई कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर पुनर्वसन तहसीलदार शितल जाधव सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा महसूल दिन कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी पाटील यांनी जाहीर केलेले यादीमध्ये महसूल नायब तहसीलदार शिवाजी राठोड दोडामार्ग, निवासी नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने जिल्हा कार्यालय, लघुलेखक विठोबा सावंत दोडामार्ग, जिल्हा कार्यालय, सहायक महसूल अधिकारी अनिल पवार जिल्हा कार्यालय, सहाय्यक महसूल अधिकारी सर्जेराव राणे कणकवली तहसीलदार, मंडळ अधिकारी नीलिमा सावंत जिल्हा कार्यालय, मंडळ अधिकारी शरद शिरसाट कसई, महसूल सहाय्यक प्रीतम माळी वैभववाडी, जिल्हा कार्यालय, महसूल सहाय्यक अमोल पाटील वैभववाडी, ग्राम महसूल अधिकारी आनंद गावडे वजराट, वाहन चालक बाळकृष्ण रणसिंग जिल्हा कार्यालय, वाहन चालक मारोती ओंबासे कुडाळ तहसील, हवालदार पंढरीनाथ गोसावी जिल्हा कार्यालय, शिपाई दिलीप चव्हाण मालवण तहसील, शिपाई शंकर रावले जिल्हा कार्यालय, महसूल सेवक सुभाष जाधव चेंदवण पोलीस पाटील दिलीप राणे हडपिड समावेश आहे.