35 C
New York
Tuesday, July 29, 2025

Buy now

पालकमंत्री नितेश राणेंनी नरडवे धरणग्रस्तांना दिला न्याय

विशेष आर्थिक पॅकेज मधील उर्वरीत ७५ टक्के अनुदान वाटप सुरू

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या, धरणग्रस्त समितीच्या पाठपुराव्याला यश

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेज उर्वरित ७५ टक्के अनुदान वाटण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने १७ मार्च २०२५ रोजी लघु पाटबंधारे विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत मंत्रालयामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत नरडवे मध्यम पाठ बंधारे प्रकल्प अंतर्गत विशेष आर्थिक अनुदानाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये विशेष आर्थिक पॅकेज बाबत निर्णय होऊन आर्थिक तरतूद करण्यात आली. ती संपूर्ण रक्कम प्रशासनाकडे ३१ मार्च २०२५ पूर्वी वर्ग करण्यात आली तसेच या पॅकेज पैकी २५% रक्कम ताबडतोब वाटप करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले आणि मंत्री महोदयांच्या आदेशाद्वारे विशेष आर्थिक पॅकेज वाटपाची २५% रक्कम प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली. सदर मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे १ में २०२५ महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते. व आतापर्यंत २९९ यादी तशीच ४२१ यापैकी अडीचशे खातेदारांना २५% टक्के रक्कम अदा करण्यात आली. तदनंतर जे विस्थापित झालेले आहेत व ज्या खातेदारांना भूखंड देय नाही म्हणजेच विवाहित बहिणी अशा खातेदारांना आणि मूळ गावठाणातून संपूर्ण स्थलांतरित झालेल्या खातेदारांना आज दिनांक २८ जुलै २०२५ रोजी उर्वरित ७५% टक्के रक्कम अदा करण्यात आली. माजी जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश ढवळ, अशासकीय सदस्य लुईस डिसोजा सर्व समितीचे पदाधिकारी नरडवे ग्रामपंचायत सरपंच व सर्व पदाधिकारी उपसरपंच तसेच भाजपचे सर्व प्रमुख पदाधिका-यांनी पालकमंत्री महोदय यांच्या निर्णयाचे स्वागत केले असूनसंपूर्ण नरडवे प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!