मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून आज येथे विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन
रत्नागिरी : किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय असून यासाठीच रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून आज येथे विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ही कामे वेळेत पूर्ण होतील तसेच येथील मच्छिमांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार आणि मत्स्य विभाग कटिबद्ध असून भविष्यात येथे विविध विकासकामे करून मिरकरवाडा हे बंदर सक्षम बंदर केले जाईल असा विश्वास यावेळी दिला.