26.2 C
New York
Tuesday, July 29, 2025

Buy now

कलमठ ग्रामपंचायतीची अभिनव संकल्पना

१ ऑगस्ट पासून कचरा संकलनासाठी नवे नियम

कणकवली : शहरातील कलमठ गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. १ ऑगस्ट पासून सार्वजनिक ठिकाणी व नदी पात्रात कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नदीपात्रात कचरा टाकणाण्या व्यक्तीचे जो कोणी नाव सांगेल त्याचे नाव गुपीत ठेवून त्याला बक्षीस म्हणून ५०० रुपये बक्षीस ग्रा. पं. कडून दिले जाणार आहे.

स्वच्छ व सुंदर कलमठ गाव अभियाना अंतर्गत १ ऑगस्ट पासून घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी येणाथ्या सफाई कर्मचाण्याकडे ओला कचरा द्यायला आणि आठवडयातून १ दिवस म्हणजे गुरुवारी घरातील सुका कचरा त्या सफाई कामचाण्याजवळ द्यावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाश्यावर २,००० रुपयांचे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नदीपात्रात कचरा टाकणाऱ्याना २,००० रुपयांचे दंड आकारण्यात येणार आहे. नदी पात्रात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव जो कोणी सांगेल त्या व्यक्तीचे नाव गुपीत ठेवून त्याला बक्षीस म्हणून ५०० रुपये देण्यात येणार आहे. कलमठ गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ग्रा.पं.ने केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!