कणकवली : शहरातील श्री विद्या क्लासेसचे संचालक व आशिये गावचे रहिवासी मिलिंद कमलाकर सामंत ( वय ५२ ) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
श्री विद्या क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केली होती.
त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर आशिये येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.