27.2 C
New York
Friday, July 25, 2025

Buy now

हद्दपारचे आदेश अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांनी मोडले

कणकवली पोलिसांनी घेतले ताब्यात

दोघांवरही आदेश भंगाचा केला गुन्हा दाखल

कणकवली : तालुक्यातील कुर्ली वसाहत येथील अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र हद्दपारी आदेशाचा भंग करून या दोघांनी कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा कल्पना न देता सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी दोघांवरही हद्दपार असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी महाराष्‍ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४१ व १४२ नुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री १० वा. च्या सुमारास करण्यात आली.

उपविभागीय दंडाधिकारी कणकवली यांनी अनंत गंगाराम पिळणकर आणि देवेंद्र अनंत पिळणकर दोन्ही रा. नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट लोरे नं.१ (ता.कणकवली) येथून २१ फेब्रुवारी २०२५ पासून एक वर्षासाठी हद्दपारीचे आदेश दिले होते. हद्दपारीच्या आदेशानंतर दोन्ही व्यक्‍ती कोल्हापूर येथे वास्तव्याला होत्या.
दरम्‍यान हद्दपारीचे आदेश बजावण्यात आलेले दोघेही नवीन कुर्ली वसाहत येथील आपल्‍या घरी आले असल्याची गोपनीय माहिती कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या पर्यंत पोहोचली. लागलीच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत व पोलीस नाईक सचिन माने नवीन कुर्ली वसाहत येथे जाण्यास सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली. अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर घरी आढळून आले. आपल्‍या मुलाची तब्येत बरी नसल्‍याने त्‍याला पाहण्यासाठी मी आणि देवेंद्र असे दोघे आपल्‍या घरी आलो असल्‍याची माहिती अनंत पिळणकर यांनी दिली. मात्र सिंधुदुर्गात प्रवेश करण्यासाठी पिळणकर यांनी सक्षम अधिकारी यांच्याकडून परवानगी घेतली नव्हती. तसेच हद्दपारी आदेशा विरोधात स्थगिती ही प्राप्त केली नव्हती. अनंत गंगाराम पिळणकर आणि देवेंद्र अनंत पिळणकर या दोघांनाही कणकवली पोलीस ठाण्यात आणून त्यांना सूचना पत्र देऊन गुन्हा दाखल केला. तसेच ते जिल्ह्याबाहेर राहत असलेल्या ठिकाणी पोहोचवून आले, असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर सावंत करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!