निलेश राणेंच्या हस्ते शुभारंभ
दहा डायलेसिस यंत्रे कार्यान्वित, रूग्णांना होणार फायदा
कुडाळ : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात नूतन किडनी डायलेसिस केंद्राचे लोकार्पण कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रात आता दहा अद्ययावत किडनी डायलेसिस यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत, त्यामुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, तसेच संजय पडते, विनायक राणे, दीपक नारकर, दीपक पाटकर, राकेश कांदे, विलास कुडाळकर, रेवती राणे, आबा धडाम, आना भोगले, संदेश नाईक, राजन भगत, डॉ. भावना तेलंग, डॉ. संजय वाळके, ओंकार तेली, संजय भोगटे, मंगेश चव्हाण, रुपेश बिडये आदी मान्यवर उपस्थित होते.