27.2 C
New York
Friday, July 25, 2025

Buy now

फ्लाय९१ ने प्रादेशिक प्रवास आणि आदरातिथ्य सुलभ होणार

सरोवर हॉटेल्समध्ये प्रादेशिक पर्यटन वाढवण्यासाठी महत्त्वाचा करार…

कुडाळ : फ्लाय९१ आणि सरोवर हॉटेल्स यांनी प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाची भागीदारी जाहीर केली आहे. भारताची प्रामुख्याने प्रादेशिक सेवा देणारी विमान कंपनी आणि देशातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी साखळी एकत्र आल्याने प्रवाशांना आता प्रवास आणि वास्तव्यासाठी सवलतीसह अधिक सुसंगत आणि समृद्ध अनुभव मिळणार आहे. फ्लाय९१ चिपी विमानतळावरून पुणे, बंगलोर, हैदराबाद साठी सेवा देते. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हि चांगली बातमी आहे. या कराराअंतर्गत, फ्लाय९१च्या प्रवाशांना गोवा, सिंधुदुर्ग, पुणे, बंगलोर, हैदराबाद आणि सोलापूर येथील सरोवर हॉटेल्समध्ये रूम बुकिंग आणि खाद्यपदार्थांवर २०% विशेष सवलत मिळणार आहे. SAROVARFLY91 हा कोड वापरून सरोवर हॉटेल्सच्या वेबसाइटवर किंवा कॉल सेंटरवर थेट बुकिंग करताना सवलत मिळेल. ही सवलत ग्राह्य धरण्यासाठी फ्लाय९१ चे बोर्डिंग पास दाखवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, सरोवर हॉटेल्सच्या पाहुण्यांना फ्लाय९१ च्या कोणत्याही मार्गावरील बेस भाड्यांवर १०% सवलत दिली जाईल. ही ऑफर फ्लाय९१ आणि सरोवरच्या अधिकृत वेबसाइट्सवर उपलब्ध असेल. प्रवाशांना सोयीसुविधांनी समृद्ध अनुभव देण्याच्या आमच्या सामायिक दृष्टिकोनाचे हे प्रतिक आहे, असे सरोवर हॉटेल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष (व्यावसायिक) अक्षय थुसो यांनी या कराराबद्दल बोलताना सांगितले. हॉटेल सेवा आणि प्रादेशिक विमानसेवा एकत्र आल्यामुळे प्रवाशांचा अनुभव आणखी चांगला होणार आहे आणि भारतातील नवीन पर्यटन स्थळांचा विकास होण्यास मदत होईल. फ्लाय९१ ही कंपनी भारतात लास्ट माईल काँनेक्टिव्हीटी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारताच्या आर्थिक परिवर्तनात भाग घेण्याच्या आमच्या प्रयत्नात, आम्ही सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुलभ हवाई प्रवास प्रदान करत आहोत. हे सहकार्य त्या समान उद्दिष्टांची पूर्ती करत आहे,” असे फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले. फ्लाय९१आणि सरोवर हॉटेल्सने एकत्रितपणे हा उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामध्ये डिजिटल प्रचार आणि संयुक्त प्रचारसामग्रीचा समावेश आहे. यामधून या विशेष ऑफरबद्दल जागरूकता वाढवण्यास आणि अधिकाधिक प्रवाशांना याचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करण्यास मदत होईल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!