कुडाळ मनसेचा इशारा; बांधकामच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर…
कुडाळ : तालुक्यातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी तात्काळ बुजवा, अन्यथा घंटानाद आंदोलन करू, असा इशारा कुडाळ मनसेच्या माध्यमातून बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. तालुक्यातील मालवण रस्ता, संत राऊळ महाराज मठ रस्ता व इतर प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. वारंवार लक्ष वेधून सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम विभागाचा दुर्लक्ष आहे. त्यामुळे याबाबत मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. याबाबतचे निवेदन बांधकाम अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, वाहतूक सेनेचे विजय जांभळे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर तथा राजवर्धेकर आदी उपस्थित होते.