कणकवली : अल्पवयीन मुलीचा चोरून पाठलाग करून तीची वाट अडवून धमकी दिली. तसेच तीचे अश्लिल फोटो काढत विनयभंग केल्याप्रकरणी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके रा. बेळणेखुर्द याची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
आरोपीने २०१९ मध्ये संबंधीत अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तीचा चोरून पाठलाग केला. तसेच तीची वाट अडवून तीच्या बडिल व भावाला मारून टाकेन अशी वेळोवेळी धमकी दिली. तीच्या मोबाईलवर अनेकदा अश्लिल मेसेज पाठविले. तसेच तीला एकांतात गाठून अश्लिल फोटो काढले व विनयभंग केला. याबाबत दाखल तक्रारीनुसार भादवि कलम ३५४, ३५४ ड, ३४१, ५०६ बालकांचे अत्याचारापासून संरक्षण कायदा ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुनावणीत सरकारपक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावतीमुळे न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.