कणकवली : येथील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
गुरुवार ३१ जुलै तेलीआळी मित्रमंडळ, शुक्रवार १ ऑगस्ट महापुरुष मित्रमंडळ, शनिवार २ ऑगस्ट पटकीदेवी मित्रमंडळ, रविवार ३ ऑगस्ट ढालकाठी मित्रमंडळ, सोमवार ४ ऑगस्ट जुना मोटर स्टॅण्ड मारुतीआळी मित्रमंडळ, मंगळवार ५ ऑगस्ट बिजलीनगर मित्रमंडळ, बुधवार ६ ऑगस्ट आंबेआळी मित्रमंडळ, गुरुवार ७ ऑगस्ट नगर प्रदक्षिणा, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या हरिनाम सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, श्री देव काशीविश्वेश्वर देवस्थान कणकवली यांनी केले आहे.