23.8 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

चुकीची माहिती देणाऱ्या पोलीसांच्या विरोधात जयंत बरेगार यांचे आंदोलन

डीवायएसपी कार्यालयात ठिय्या

ठोस आश्वासन मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा

सावंतवाडी : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून तपासाबाबत चुकीची माहिती देण्याऱ्या कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सावंतवाडी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मी मागितलेल्या प्रकरणाची माहिती मिळत नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत पत्र मिळत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या दैनंदिनी बाबत आपण माहिती मागितली होती. त्यानंतर या मागणीसाठी आपण एक ते तीन मे या काळात ओरोस येथे बेमुदत उपोषण केले होते. याही संबंधित माहिती व चौकशी करण्यात आली असून त्याची प्रत उपविभागीय अधिकारी कार्यालय सावंतवाडी या ठिकाणी पाठविण्यात आली, असा त्या ठिकाणी शेरा मारण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात ती माहिती पाठवण्यात आली नाही. याबाबतची माहिती श्री. बरेगार यांनी घेतली. मात्र आपल्याला अशा प्रकारची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे पोलीस निरीक्षक मगदूम यांच्याकडून व त्यांचे सहकारी गणेश कराडकर यांच्याकडून उपविभागीय पोलीस कार्यालयाची फसवणूक झाल्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत श्री. बरेगार यांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!