23.8 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

मुंबई गोवा महामार्गावर बीएमडब्ल्यू कार पलटी

एकजण जखमी ; कारचे मोठे नुकसान

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मंगळवारी सायंकाळी ४:४७ वा. च्या सुमारास गोवा येथून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू ( एमएच ०४ एमआर १२०६ ) कारला अपघात झाला. या अपघातात चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तर बीएमडब्ल्यू चे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर अपघातात जखमी झालेल्याना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संदीप नायक, दीपक लोया, सुधींद्र प्रभू ( सर्व रा. ठाणे ) हे मेंग्लोरे येथे देव दर्शनासाठी गेले होते. येथून आल्यावर त्यांनी गोवा येथे विश्रांती घेतली. त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली. कणकवली येथील हळवल फाटा येथे गडनदी पुलावरील तीव्र वळणावर आल्यावर बीएमडब्ल्यू कारच्या टायरला खिळा घुसला व टायर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट हळवल फाटा येथील तीव्र वळणावर मुंबई दिशेने जात असताना उजव्या बाजूने थेट पुन्हा गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर जाऊन पलटी झाली. यामध्ये चालक संदीप नायक यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. मात्र सुदैवाने अन्य दोघांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र कारचे दर्शनी भागासह अन्य भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघात झाल्यावर तातडीने अपघाताची माहिती डायल ११२ वर देण्यात आली. लागलीच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी दजव घेतली व अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या तिन्ही प्रवाशांना बाहेर काढले. दरम्यान कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनोज गुरव, कविता सावंत, किरण कदम, तसेच महामार्ग वाहतूक पोलीस शाखेचे संदेश आबिटकर, यश आरमारकर, नंदू गोसावी आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते.

कार रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाल्याने एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने अपघात ग्रस्त बीएमडब्ल्यू कार बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!