पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार लोकार्पण सोहळा संपन्न
कणकवली – तालुक्यातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. अलीकडेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात एक समस्या निर्माण झाली होती ती म्हणजे सिटी स्कॅन ची सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र तीही समस्या महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टिक च्या माध्यमातून दूर करण्यात आली आहे. सिटी स्कॅन सेंटर आजपासून रुग्णांच्या सेवेत उपलब्ध होणार असून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते मंगळवारी सकाळी ९:३० वाजता लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन सेवा उपलब्ध झाली असून त्याच्या काही महत्वाच्या चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत. गोर – गरीब रुग्णांना उपचारासाठी ही सिटी स्कॅन मशीन महत्वाकांक्षी ठरणार आहे. या उपक्रमाचे रुग्ण आणि नातेवाईकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.