झालेल्या कामांचा निधी मुदतीत देणार
रस्ते खड्डे व झाडी मुक्त करा – मंत्री नाम. नितेश राणे
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : जिल्ह्यातील काही ठिकाणच्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत. जिल्हा परिषद, राज्य व राष्ट्रीय दर्जाच्या सर्व रस्त्यांची डाकडुजी करून घ्या. प्रथम प्राधान्याने खड्डे बुजवा. ६३ कि.मी. सार्वजनिक बांधकामकडे असणारे रस्ते व १८८ कि.मी. इतर जिल्हा मार्गावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरण्याचे काम तात्काळ सुरू करा. या झालेल्या सर्व कामांचे पैसे देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. हे पैसे असलेल्या मुदतीतच मिळतील याचा ठेकेदार एजन्सीना विश्वास द्या. खड्डे भरा व दर्जेदार कामे करा अशा सूचना पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित आढावा बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, आदिक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता मनिषा पुजारे, पूजा इंगवले व अन्य अधिकारी अभियंते उपस्थित होते.