नेटवर्क समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या
आढावा बैठकीत नाम. नितेश राणे यांच्या बीएसएनएल अधिकाऱ्यांना सूचना
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : बीएसएनएल चे फक्त टॉवर उभे केलेले नको, ते कार्यान्वित करा. ग्राहकांना दर्जेदार सुविधा द्या. त्याचप्रमाणे ग्रहकांना नेटवर्क समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
ज्या गावांत बीएसएनएल टॉवर आहेत, त्या गावातली टॉवरवरून ग्राहकांना नेटवर्क मिळते की नाही हे गांभीर्याने पाहा. जिथे टॉवर आहेत त्यांना रेंज येत नसेल तर त्याबाबत तातडीने उपाययोजना करा. खासदार नारायण राणे यांनी केलेल्या सूचनांची तातडीनं पूर्तता करा. अन्यता अधिकाऱ्यांना रेंज नसलेल्या ठिकाणी पाठवू, अशी सक्त सूचना नाम. नितेश राणे यांनी दिली.
बीएसएनएल नेटवर्कबाबत जिल्ह्यात अनेक तक्रारी आहेत. टॉवर उभे केलेत मात्र रेंज नाही, अशी उदाहरणे मंत्री नाम. नितेश राणे यांनी देत अधिकाऱ्यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नेटवर्क मिळत नाही अशा तक्रारी यापुढे येता नयेत, अशा सूचना देखील दिल्या.