सरपंच अनुजा राणे व उपसरपंच स्नेहल नेवगे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केला भाजपात प्रवेश
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केला प्रवेशकर्त्यांचे स्वागत
कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी वाघेरी गावचे उबाठा शिवसेनेचे सरपंच अनुजा अनंत राणे,
स्नेहल मंगेश नेवगे (उपसरपंच), निधी नितीन राणे (सदस्य ), प्रकाश वाघेरकर ( उपतालुका प्रमुख युवसेना /माजी ग्रा. पं. सदस्य ),
मंगेश नेवगे ( माजी ग्रा. पं. सदस्य ),
जयश्री वाघेरकर ( माजी ग्रा. पं. सदस्य ), गोपाळ कदम ( संचालक सोसायटी ), निलेश वाघेरकर, राजेश कदम, रामदास कदम, एकनाथ वाघेरकर, दिनेश पेडणेकर, सुरेश कदम, साई नेवगे, संजय कदम, सिद्धेश कदम, संकेश कदम, मुकेश कदम, प्रवीण गुरव, सिद्धेश मोंडकर, अक्षय कदम, अमित पेडणेकर, सुलोचना वाघेरकर, चैताली कदम, शीतल कदम, दिव्या पेडणेकर, चैत्राली कदम
चित्रांगी कदम, सुवर्णा कदम यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
पालकमंत्री नाम. नितेश राणे जिल्ह्यात करत असलेली विकासकामे आणि त्यांच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, पंढरी वायंगणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.